सातारा : भारतातील आद्य स्त्री शिक्षिका व स्त्री शिक्षणाच्या जनक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 187 वी जयंती सोहळा व माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या प्रचार चित्ररथाचा शुभारंभ बुधवार दि. 3 जानेवारी 2018 रोजी सकाळी 8.30 वा. विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व महिला व बाल विकास, ग्रामीण विकास मंत्री पंकजाताई मुंडे, पशुसंवर्धन व मत्सविकास मंत्री महादेव जानकर, जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे, जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, कृषी व फलोत्पादन पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नायगाव ता. खंडाळा येथे संपन्न होणार आहे.
याप्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे,श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, शंभुराज देसाई, जयकुमार गोरे, दिपक चव्हाण,मोहनराव कदम, आनंदराव पाटील, नरेंद्र पाटील, दत्तात्र्य सावंत तसेच अधिकारी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
0000
बुधवारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती सोहळा
RELATED ARTICLES

