कराड : पश्चिम महाराष्ट्रतील सर्वात मोठी यात्रा म्हणुन ओळखल्या जाणार्या पालता. कराड येथील श्री खंडोबा देवाची यात्रा रविवार दि. 31 डिसेंबर रोजी होत आहे. श्री खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळयासाठी पाल नगरी सज्ज झाली आहे. यात्रेच्या अनुषंगाने सर्व, तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख मानकरी तथा काराड पं. स.चे माजी सभापती देवराज पाटील यांनी दिली.
यात्रेस येणार्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यादृष्टीने यात्रा कमिटी, ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्ट सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत.पिण्याचे शुध्द पाणी, सुलभ शौचालय सुविधा, आरोग्य पथके, रूग्ण वाहिका या अत्यावश्यक बाबी ग्रामपंचायतीने उपलब्ध केल्या आहेत.
मुख्य मिरवणुक मार्गावर तारळी नदीपात्रात पुल उभारण्यात आला असून, या पुलावरून आज रथाची ट्रायल घेण्यात आली. त्याचप्रमाणे यात्रा नियोजन बैठकीत केलेल्या सुचनांच्या अनुषंगाने भैरोबा ओढयानजीकच्या पुलाला बॅरिगेटस् लावण्यात आले आहेत. भाविकांना दर्शनबारीतुन शिस्तबध्दतेने दर्शन मिळावे या दृष्टीने योग्य नियोजन करण्यात आले असल्याचे देवस्थानचे संचालक संजय काळभोर यांनी सांगितले, यात्रा कालावधीत भाविकांना व व्यावसायिकांना कोणतीही अडचणी येवु नये यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या असुन, याकामी ग्रामपंचायत, यात्रा कमिटी आणि देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांनी योग्य नियोजन केले आहेत. तसेच प्रशासनाने आपली कामगिरी चोख बजावण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. यात्रेतील भाविकावर लक्ष ठेवण्यासाठी वाळवंटात ठिकटिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. दिवसभरात लहान मोठी पाळणाघरे, सिनेमाचे तंबु याठिकाणी भाविकांची गर्दी होवु लागली आहे. श्री खंडोबा मंदिर हे विद्युतरोषणाईने उजळुन निघाले असुन, दर्शनासाठी आजपासुन भाविकांची गर्दी होवु लागली आहे.
पाल यात्रा, शांततेत पार पाडण्यासाठी भाविकांनी सहाकार्य करावे, असे आवाहने देवस्थान प्रमुख देवराज पाटील, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसिलदार राजेंद्र शेळके, पपेलिस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे, उंब्रज पोलिस ठाण्याचे पो.नि. जोतिराम गुंजवटे यांनी केले आहे.

