फलटण: फलटण शहरातील एकमेव असलेल्या दशक्रीया विधी जागेच्या झालेल्या दुरावस्थेबाबत लवकरात लवकर दुरूस्ती न झाले 26 जानेवारी रोजी उपोषण करणार असल्यांचा इशारा मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांनी मुख्यधिकार्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
यावेळी अशोक जाधव महाराजा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष युवराज पवार,शिवसेनेचे तालुका अध्यक्ष.प्रदिप झणझणे,स्वपनिल मुळीक,मनसेचे उपजिल्हा प्रमुख युवराज शिंदे,सामाजिक कार्यकर्ते अमिरभाई शेख,पंकज पवारसर,जगदाळेसाहेब, हे उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की फलटण शहराती एकमेव असलेल्या दशक्रीया विधी जागेच्या झालेली दुरावस्थेची तात्काळ पुर्नबांधणी करून दुरूस्ती करण्यात यावी ऐतीहासिक अशा फलटण शहरातील सदर जागेची झालेली अवस्था लाजिरवाणी असुन ती तात्काळ दुरुस्त करावी अन्यथा येणार्या प्रजासत्ताक दिनी दशक्रीया विधी (दत्त घाट) येथे उपोषणाला बसणार असल्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
फलटण येथील दशक्रिया विधी जागेची लवकर दुरूस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा
RELATED ARTICLES

