वाई : राजपुरी, (ता. महाबळेश्वर) येथून उड्डाण करून अभेपुरी गावच्या हद्दीत कोरियन नागरिक गंभीर जखमी झाला होता.उपचारासाठी वाई येथे दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.आपल्या सहकार्यांसह मुंबई येथून सदर नागरीक पाच दिवसांच्या टूर वर पाचगणी येथे आला होता.मंगळवारी सायंकाळी प्याराग्लायडिंगचा सराव करत असताना राजपुरी (ता महाबळेश्वर) येथून उड्डाण केल्यावर अभेपुरी(ता वाई) अभेपुरी गावच्या हद्दीत डोंगराला धडकून कोरियन नागरीक सांग टेक ओह(वय 45) जखमी झाला.वाई येथिल खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. मुंबई येथील इंडियन प्याराग्लायडिंग कॉम्पिटीशन असोसिएशनने देशी विदेशी खेळाडूंसाठी प्याराग्लायडिंग स्पर्धेचे आयोजन केले असून त्याच्या सरावासाठी हे स्पर्धक पाच दिवसांसाठी पाचगणी येथे आले होते.
दरम्यान, सराव करताना एक स्पर्धक अभेपुरी हदीत कोसळला व त्याचा मृत्यू झाला.ही माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अजित टिके,पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे व पोलीस कर्मचारी दवाखान्यात दाखल झाले. कोरियन दूतावसाचे अधिकारीही वाईत दाखल झाले.
आज सकाळी शवविच्छेदन करून व परदेशी नागरिक असल्याने सोपस्कर पूर्ण करून मृतदेह संबंदितांच्या ताब्यात देण्याचे आला.त्याच्यावर वाईच्या स्मशानभूमीत हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. स्पर्धेचे आयोजक विटास खरास, तळमजला,49, टर्नर रस्ता, टाऊन व्हिलेज, बांद्रा, पश्चिम मुंबई यांच्यावर सहायक पोलिस निरीक्षक बी बी येडगे यांनी प्याराग्लायडिंगचा सराव करत असताना मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे.सदर व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. वाई येथे गुन्हा नोंदवून पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला.
पॅराग्लायडिंग करताना डोंगराला धडकून परदेशी नागरिकाचा मृत्यू
RELATED ARTICLES

